Q. भारताच्या राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम समान नागरी कायदा लागू करण्याशी संबंधित आहे?
1) कलम 41
2) कलम 42
3) कलम 43
4) कलम 44
(गोदिया चालक 2023, ठाणे शहर पोलीस 2023) (हा प्रश्न आत्तापर्यंत 20 पेक्षा अधिक वेळा विचारला आहे.)
Answer – (4) कलम 44
- एकरूप नागरी संहिता ही एक अशी तरतूद आहे ज्याद्वारे प्रत्येक मोठ्या धार्मिक समुदायाचे धर्मग्रंथ आणि सामाजिक परंपरावर आधारलेल्या वैयक्तिक कायद्यांच्या जागी देशातील सर्व नागरिकांना लागू होईल असा एकच सामायिक संच असावा.
- वैयक्तिक कायदा हा सार्वजनिक कायद्यापासून वेगळा असतो आणि त्यामध्ये विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, दत्तक घेणे, पोटगी यासारख्या विषयांचा समावेश होतो.
- गोवा राज्यामध्ये सामायिक कौटुंबिक कायदा स्वीकारलेला असल्याने गोवा हे एकरूप नागरी संहिता असलेले भारतातील एकमेव राज्य आहे.